सरकारी योजना Channel Join Now

जिराफ प्राण्याची संपूर्ण माहिती Giraffe Animal Information In Marathi

Giraffe Animal Information In Marathi आपल्या उंचच उंच मानेसाठी ओळखला जाणारा प्राणी म्हणजे जिराफ होय. पिवळे व काळे ठिपके असणारा हा प्राणी सर्वत्र प्रसिद्ध असून, अनेक लोकांना या प्राण्याचे आकर्षण असते. जिराफिडी या कुळाचा हा प्राणी चीन, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, रशिया, ग्रीस यांच्यासह भारत देशामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतो. हा प्राणी बऱ्याच काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात असून, त्याच्या पूर्वजांचे अवशेष देखील आढळून आलेले आहेत.

Giraffe Animal Information In Marathi

जिराफ प्राण्याची संपूर्ण माहिती Giraffe Animal Information In Marathi

एक सस्तन प्राणी असण्याबरोबरच हा शाकाहारी स्वरूपाचा प्राणी देखील आहे. झाडाच्या उंच फांद्या तोडून खाण्यामध्ये तो तरबेज असतो. सस्तन प्राण्यांमधील सर्वात जास्त उंच प्राणी म्हणून जिराफ प्राण्यांना ओळखले जाते. हे प्राणी शांत असले तरी देखील स्वसंरक्षणासाठी ते कधी कधी इतर प्राण्यांवर हल्ला देखील करताना आढळून येत असतात.

जिराफ सहसा आढळत नसला, तरी देखील प्राणी संग्रहालयामध्ये तुम्ही त्याला सहजरित्या बघू शकता. मुख्यतः आफ्रिकन उगमाचे हे प्राणी नामशेष झालेले नसले, तरी देखील त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे देखील फार गरजेचे ठरते. अन्यथा काही कालावधीमध्येच हे प्राणी देखील नाश पावू शकतात. यासाठी जागतिक तापमान वाढ आणि मोठ्या प्रमाणावर केली जाणारी शिकार कारणीभूत ठरते. वेगवेगळ्या चार स्वरूपाच्या प्रजाती या जिराफ प्राण्यांमध्ये आढळून येत असतात.

पूर्वी जिराफ पाण्याच्या ११ प्रजाती आढळत असत, मात्र त्यातील काही प्रजाती नामशेष झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये अवघ्या चार प्रजाती शिल्लक राहिलेल्या आहेत. आजच्या भागामध्ये आपण या जिराफ प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावजिराफ
वैज्ञानिक नावजिराफा कॅमलोपार्डीस
साधारण लांबी१४ ते १९ फूट
साधारण उंची१६ फूट
साधारण आयुष्य२० ते २५ वर्ष
प्रकारप्राणी
उपप्रकारशाकाहारी प्राणी
साधारण वजन१२०० ते १९०० किलो
किंगडमऍनिमलिया

उंच आणि वेगाने चालू शकणारा प्राणी म्हणून जिराफ या प्राण्याला ओळखले जाते. अरबी भाषेमध्ये असणाऱ्या झरापा या शब्दापासून जिराफ हे नाव पडले असावे असे सांगितले जाते.

जिराफ प्राण्याचे निवासस्थान:

आपण चित्रांमध्ये अनेकदा जिराफ हा प्राणी बघितला असेल, मात्र फार कमी लोकांनी हा प्राणी प्रत्यक्षात बघितला असेल? कारण मुख्यतः दक्षिण आफ्रिकेच्या जंगलांमध्ये आढळणारा हा प्राणी भारतामध्ये केवळ प्राणीसंग्रहालयामध्येच बघायला मिळतो. अतिशय शांत स्वरूपाचा असणारा हा प्राणी काहीसा उग्र देखील आहे.

सामाजिक स्वरूपाचा असणारा हा प्राणी जवळपास १२ ते १५ जिराफ यांचा मिळून एक कळप बनवत असतो. काही ठिकाणी अगदी ७० ते ८० प्राण्यांपर्यंत देखील यांच्या कळपाची संख्या आढळून येत असते. या कळपामध्ये एक जिराफ हा त्यांचा पुढारी असतो, जो प्रौढ नर असतो. तर कळपामध्ये मादी आणि इतर लहान पिल्ले देखील आढळून येत असतात.

जिराफ प्राण्याची शरीररचना:

जिराफ हा प्राणी सर्वात उंच म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मानेकरीता तो जगप्रसिद्ध आहे. डोकं धरून त्याच्या शरीराची संपूर्ण लांबी अगदी ४ मीटर पर्यंत समजली जाते. किमान ५५० ते कमाल ८०० किलो पर्यंत असणारा हा प्राणी पिवळसर रंगाचा असतो, व त्यावर काहीसे काळसर पांढरे व तांबूस रंगाचे ठिपके आढळून येत असतात.

शरीराच्या वरील बाजूस गडद रंग तर खाली येताना हा रंग फिकट होत जातो. त्याच्या मानेवर काही स्वरूपात केस अर्थात आयाळ देखील दिसून येत असते. या प्राण्यांना एकदम छोटेसे अर्थात आखूड स्वरूपाचे शिंगे देखील आढळून येत असतात, जे दहा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत लांब असतात. अतिशय झुबकेदार शेपटी असलेले हे प्राणी लांब पायाचे व मजबूत स्वरूपाचे असतात.

उंच असणाऱ्या या जिराफ प्राण्यांची जीभ देखील फारच वैशिष्ट्यपूर्ण असते, जी सुमारे दीड फुटापर्यंत लांब समजली जाते. ही जीभ बाहेर काढून तो विविध झाडाची पाने तोंडामध्ये ओढत असतो, व झाडपाला तोडून खात असतो. याचे डोळे व नाक देखील अतिशय तीक्ष्ण असते, त्यामुळे लवकरच कुठल्याही धोक्याची जाणीव त्याला होत असते.

जिराफ प्राण्याची खाद्य संस्कृती:

जिराफ हा एक शाकाहारी प्राणी असल्यामुळे तो विविध झाडाझुडपांना खाणे पसंत करत असतो. झाडाची पाने, कोवळी पालवी, आणि फळे हे त्याचा मुख्य आहार असतात. काही वेळेला तो झाडाची साल देखील खात असतो. जवळपास प्रति दिवस ३४ किलो अन्न आवश्यक असणारा हा प्राणी तेवढाच धिप्पाड देखील असतो.

हे प्राणी सामाजिक स्वरूपात आढळून येतात, ज्यामुळे ते मोठ्या स्वरूपात गट करून स्थलांतर करत असतात. त्यांचा सर्वात मोठा कळप हा ७० प्राण्यांचा आढळून आलेला असून, साधारणपणे दहा ते पंधरा प्राण्यांचा एक गट मिळून ते राहत असतात. कधी कधी दोन गट एकत्र करून देखील हे प्राणी प्रवास करताना आढळून येतात, मात्र या दोन्ही गटांचे प्रमुख नेहमी आपल्या गटांना सांभाळण्याचे कार्य करत असतात. मुख्यतः प्रजननाच्या कालावधीमध्ये हे प्राणी मोठे गट निर्माण करत असतात, जेणेकरून प्रजनन करणे सोयीचे होते.

निष्कर्ष:

अतिशय उंच प्राणी कोणता असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच जिराफ हा प्राणी येतो. त्याच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पिवळ्या व काळ्या रंगासाठी तो ओळखला जातो. अतिशय उंच असलेला हा प्राणी दिसताना देखील खूपच धिप्पाड दिसत असतो, मात्र तो तेवढाच शांत देखील असतो.

झाडाची उंचावरील पाने खाण्यासाठी या प्राण्याला ओळखले जाते. या प्राण्याला दुसऱ्या प्राण्यांना इजा करणे आवडत नसले, तरी देखील स्वतःचे संरक्षण करण्याची वेळ येते त्यावेळेस हा प्राणी आक्रमक होऊन दुसऱ्या प्राण्याला इजा देखील करत असतो. मुख्यतः आफ्रिका या खंडात उगम पावलेला हा प्राणी जगभरातील अनेक देशांमध्ये देखील आढळून येत असतो. आजच्या भागामध्ये आपण या जिराफ प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे.

ज्यामध्ये या प्राण्याचे आयुष्य, त्याची शारीरिक रचना, हे प्राणी मुख्यतः कोठे राहतात, खाण्यासाठी कोणत्या गोष्टीला या प्राण्यांद्वारे प्राधान्य दिले जाते, तसेच यांचे सामाजिक बंध, जिराफ प्राण्यांमधील पुनरुत्पादन व मानवाशी असलेला संबंध इत्यादी सर्व माहिती बघितलेली आहे.

FAQ

जिराफ हा प्राणी कोणत्या वैशिष्ट्यांकरिता ओळखला जातो?

जिराफ हा प्राणी त्याच्या उंची करिता अर्थात लांब माने करिता ओळखला जातो. प्राण्यांमधील सर्वात उंच प्राणी म्हणून जिराफ प्रसिद्ध आहे.

जिराफ या प्राण्याचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते?

जिराफ हा प्राणी मध्यम कालावधी जगणारा असून, तो जंगलात राहिल्यास २५ ते ३० वर्षे जगत असतो. मात्र त्याला पाळल्यास तो आणखी दहा वर्ष अर्थात ३० ते पस्३५तीस वर्ष जगत असतो.

जिराफ या प्राण्यांमधील प्रजननाबाबत काय सांगता येईल?

जिराफ हा प्राणी सस्तन स्वरूपाचा असून, तो आपल्या पिल्लांना स्वतः जन्म देत असतो. एकावेळी केवळ एकच पिल्लू या जिराफ प्राण्यांमध्ये जन्माला येत असते.

जिराफ या प्राण्याला कोणकोणत्या गोष्टींपासून धोका आहे, किंवा संघर्ष करावा लागतो?

जिराफ हा प्राणी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर नसला, तरी देखील त्याला अनेक गोष्टींपासून धोका देखील आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या प्राण्यांच्या निवासस्थानाची उलथापालथ, या प्राण्यांची अवैधरित्या करण्यात येणारी शिकार, आणि मानवाशी यांचा होणारा संघर्ष हे सगळे जिराफ प्राण्यासाठी धोके समजले जातात.

जिराफ या प्राण्याबद्दल काय वैशिष्ट्य सांगता येतील?

जिराफ हा शाकाहारी असला, तरी देखील शरीराने अतिशय धिप्पाड व उंच असतो. जो आहारामध्ये झाडाची पाने, फळे, आणि नवीन पालवी इत्यादी गोष्टींचा समावेश करत असतो.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment