Ghana Information In Marathi घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश असून आक्रा ही त्याची राजधानी आहे व तेथील सर्वात मोठे शहर आहे. पंधराव्या शतकातील यूरोपीय शोधक येथे दाखल होण्याच्या आधी येथे स्थानिक जमातीचे राज्य होते. 1874 मध्ये ब्रिटिशांनी येथे वसाहती स्थापन केल्या. सोन्याच्या मुबलक साठ्यामुळे यांचे नाव गोल्ड कोस्ट ठेवले.तर चला मग या देशाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
घाना देशाची संपूर्ण माहिती Ghana Information In Marathi
गोल्ड कोस्टला 1957 साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली. घाना आता संयुक्त राष्ट्रीय राष्ट्रकुल परिषद आफ्रिकन संघ या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे तसेच आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेच्या खालोखाल घाना देशाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात खूप प्रसिद्ध आहे.
क्षेत्रफळ व विस्तार :
घाना या देशाचे क्षेत्रफळ 2,38,539 चौरस किमी असून या देशाच्या पश्चिम दिशेला कोट दि आईव्हर तर उत्तर दिशेला बर्किना, फासो व पूर्व दिशेला टोगो हे देश आहेत व दक्षिणेला गिनीचे आखात आहे.
भूवर्णन :
या देशाचा मोठा भाग हा होल्टा नदीच्या सपाट व सखोल अशा खोर्याने व्यापलेला असून आग्नेयपासून ॲक्राच्या उत्तरेपासून टोगोच्या सीमेपर्यंत अक्वापीम-टोगो टेकड्याच्या रांगा असून त्यांची उंची 450 मीटर एवढी आहे. घाना तील सर्वात उंच शिखर मौंट जेबोबों व मौंट अफाज्जातो ही शिखरे असून त्यांची उंची 776 व 889 मीटर आहे. तसेच या देशाच्या ईशान्य भागात गांबागा पठारी प्रदेश आहे. पश्चिम, उत्तर व नैऋत्य भाग आणि अक्वापीम-टोगोम टेकड्या कँब्रियनपूर्व खडकांच्या असून व्होल्टाचे खोरे प्राथमिक वालुकाश्माचे आहे.
हवामान :
घाना हा देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्यामुळे येथील तापमान उष्ण असते. ईशान्य दिशेकडून येणारे उष्ण व कोरडे धुली युक्त वारे व नैऋत्य कडून येणारे सौम्य व आद्र मोसमी वारे एकत्र येतात. या वाऱ्यांवरच घाणा या देशाचे हवामान अवलंबून असते. तेथे जोरात गडगडाटी वादळे निर्माण होतात. तसेच नाही उत्तरेकडून येणारे हवेचे लोट प्रबळ असतील तेव्हाच पाऊस पडतो. येथील वार्षिक सरासरी तापमान हे 260 ते 290 से. असते.
इतिहास :
या देशाच्या इतिहासानुसार सोळाव्या शतकापर्यंतच्या इतिहासात सहाराच्या दक्षिणेकडील सुदानी राज्य हे दक्षिणेकडे राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे यांना कोलाकवची फळे, सोने व गुलाम मिळवून ते उत्तर आफ्रिकेमध्ये विकत असत.
आताचा घाणा हा प्रदेश त्यांच्या राज्यात समाविष्ट होण्याइतका जवळ नव्हता परंतु त्याचा या देशावर परिणाम झाला. गोड गोष्टीच्या पार्श्व प्रदेशातील लहान-सहान लोक समूहामध्ये शिरून व्यापारी व राजकीय पुन्हा खाली करण्यासाठी उत्तरेकडून काही व्यापारी व राजकीय हेतू असलेले काही लोक तेराव्या शतकापासून येऊ लागले होते.
तसेच प्राचीन घाना व नंतरच्या माली साम्राज्य पर्यंत वायव्य कडे जाणारा व मांडे व्यापाऱ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला एक आणि हौसा व्यापार्यांच्या वर्चस्वाखाली असलेला हौसा प्रदेश आणि कानेम याकडे ईशान्य कडे जाणारा दुसरा असे दोन व्यापारी मार्ग चौथ्या ते तेराव्या शेतकामध्ये होते.
या देशातील पहिली महत्त्वाची राज्य म्हणजे बोनो, बांडा व गोंजा ही घानाच्या अरण्यप्रदेशापर्यंत येऊन स्थापन झाली व त्यांच्यावर प्राचीन घाना आणि माली साम्राज्याचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्यासारखाच लोकांच्या विकासावर देखील परिणाम झालेला होता. तसेच घनाच्या अरण्य प्रदेशातील व किनाऱ्यावरील अशांटी व फांटी हे लोक राहत होते.
शेती :
घाना या देशांमध्ये शेतीचे अनेक प्रकार आहे या देशामध्ये अन्न पिकांमध्ये भात, मका, कॅसावा, केळी, भुईमूग, गिनीकॉर्न, भरड धान्ये, सुरण ही असून तंबाखू, मिरी, सुंठ ॲव्होकॅडे, लिंबूजातीची फळे या पिकांचे उत्पादन घेतले जाते व निर्यात केली जाते. त्या व्यतिरिक्त येथे केनाफ, कापूस, केनाफ, तंबाखू, ताडतेल, आंबा, अननस, ऊस यांचे उत्पादन देशातील कारखान्यांना कच्चामाल मिळावा म्हणून केले जाते.
वनस्पती व प्राणी :
या देशामध्ये राखीव वन विभाग आहेत तसेच येथील वन दाट आहेत. या वनांमध्ये युटाईल, वाया, आफ्रिकन मॉहॉगनी, शेवरी इ. ही झाडे उंच वाढलेली आढळतात. तसेच त्यांच्या खांद्यांवर वेळीच पडलेल्या दिसतात व तेथे शेवाळी, ऑर्किड इत्यादींने फांद्या लगडलेल्या असतात. परकिया नावाच्या झाडापासून वनस्पती तूप तयार केल्या जाते.
या घनदाट जंगलामध्ये हिप्पो, छोटे हत्ती, सुसरी यांप्रमाणेच कमी झाडांच्या प्रदेशात व गवताळ प्रदेशात काळवीट, रेडे अनेक जातींची माकडे, तरस, चित्ते व साप, अजगर, मांबा इ. प्रकारचे प्राणी व सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने वास्तव्य करतात .
तर पक्षांमध्ये किंगफिशर, राघू, कबूतर, गिधाडे, बगळे, चिमण्या अशा प्रकारचे अनेक पक्षी व मुंग्या, त्से त्से माशी, फुलपाखरे, डास, इत्यादी कीटक आढळतात. यातील बरेच कीटक हे रोग प्रसारक आहेत. येथील डासांमुळे मलेरिया व त्से त्से माशी चावल्यास जनावरे मरतात आणि माणसांना निद्रारोग होतो.
उद्योग :
या देशातील मुख्य उद्योगांमध्येही विणकाम, कातडीकाम, जवाहीर, लोहारकाम, कुंभारकाम हे घरगुती उद्योग आहेत. तसेच छपाई व प्रकाशन आणि फर्निचर, लाकूड कापणे, पेये, कपडे, पावरोटी बनविणे हे उद्योगही येथे मोठ्या प्रमाणावर चालतात.
त्या व्यतिरिक्त साबण, खाद्य तेले, बिस्किटे, खिळे, बीर, सिगारेट, सौम्य पेये, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन, ॲल्युमिनियम पत्रा इ. बनविणे, मोटारीचे भाग जुळविणे हे उद्योगही येथे चालतात. तसेच मासे डबाबंद करणे, बोटी बांधणे, फळे, प्लायवूड विटा कौले आणि आग पेट्या बनविणे इत्यादी उद्योग चालतात.
वाहतूक व्यवस्था :
या देशामध्ये परदेशी व्यापार हा बराचसा परदेशी जहाजावर कंपन्यांमार्फत होतो. येथील शासकीय ब्लॅक स्टार लाईन या आधाराने व्यापारी लोक आवाहनाचा विकास होत आहे. या देशाला नैसर्गिक बंदरे नाहीत. टेमा व टाकोराडी हे दोन्ही बंधारे कृत्रिम आहे. या देशांमधील हे बंदरे व लोहमार्ग व शासनाच्या मालकीची असून ते शासनामार्फत चालवली जातात.
लाकूड खाण्याचे कोको इत्यादींची वाहतूक ही लोहमार्गाने केली जाते. या देशातील नॉर्दर्न व अफर या विभागात लोहमार्ग नाहीत. या देशातील ॲक्रा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तेथून घाना एअरवेजची विमाने देशातील व आफ्रिकेतील प्रमुख ठिकाणी व लंडनला जातात. कूमासी, टाकोराडी, टामाली व केप कोस्ट येथे विमानतळ आहेत.
कला व खेळ :
या देशामध्ये संस्कृती व त्यांचे वैशिष्ट्य हे पारंपारिक संगीत व नृत्य यात मध्ये दिसून येते. येथील लोक आपली पारंपारिक नृत्य व संगीत मोठ्या उत्साहाने जोपासतात. सॉकर व मुष्टियुद्ध हे गाना या देशातील अतिशय लोकप्रिय खेळ आहेत. त्याव्यतिरिक्त येथे घोड्याच्या शर्यती टेनिस शारीरिक कसरती फुटबॉल हे खेळ सुद्धा तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.
महत्त्वाची स्थळे :
घाना या देशातील पर्यटन विकास क्षेत्रामध्ये खूप मोठ्या विकास होत असून या देशातील शासनाने पर्यटकांना राहण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे दरवर्षी पर्यटक भेट देण्यासाठी येतात. या देशामध्ये ऐतिहासिक किल्ले सुंदर पुरणी राखीव वने हे पर्यटकांची आकर्षणे असून शासनाने ऍक्रा व कुमासी तिथे मोठी सहा पर्यटकांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधली असून खाजगी निवासस्थाने व उपहारगृहे देखील येथे मोठ्या प्रमाणावर आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
घाना या देशाची राजधानी काय आहे ?
आक्रा
घाना कशासाठी प्रसिद्ध आहे?
घाना त्याच्या उत्साही संस्कृती, मनमोहक संगीत, नृत्य प्रकार, केप कोस्ट कॅसल सारख्या ऐतिहासिक खुणा आणि प्रभावी फुटबॉल वारसा यासाठी प्रसिद्ध आहे.
घानाचे चलन काय आहे?
घानायन सेडी
घाना मध्ये अद्वितीय काय आहे?
घाना हे संगीत, नृत्य आणि कलेसह त्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखले जाते: घाना हे विविध वांशिक गटांचे घर आहे, प्रत्येकाच्या अद्वितीय सांस्कृतिक पद्धती आणि परंपरा आहेत.
Srushti तू यावर संपूर्ण माहिती एकदम छान पद्धतीने मांडलेली आहे ती समजायला सोपी जाते , मला तुझी ही संकल्पना खुप खुप आवडलेली आहे , तुझे मनापासून खुप खुप अभिनंदन , अशीच उत्कृष्ट माहिती यावर देत जा , तसेच तुझे मनापासुन आभारी आहे .👍👍👍💐💐💐💐