जर्मनी देशाची संपूर्ण माहिती Germany Information In Marathi

Germany Information In Marathi जर्मनी हा मध्य युरोपमधील एक स्वतंत्र देश आहे. हा देश रशियानंतर युरोपमधील दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, आणि युरोपियन युनियनचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला सदस्य राज्य आहे. चला तर मग या देशाविषयी माहिती पाहूया.

Germany Information In Marathi

जर्मनी देशाची संपूर्ण माहिती Germany Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

जर्मनी देशाचे एकूण क्षेत्रफळ 3,57,022 किलोमीटर येवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनाने हा देश जगात 63 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून जर्मनीच्या उत्तर दिशेला डेन्मार्क राज्य आहे. तसेच पूर्व दिशेला पोलंड आणि झेक प्रजासत्ताक राज्ये आहेत. आणि दक्षिण दिशेला ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड देश आहेत. पश्चिम दिशेला फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलँडची सीमा लाभलेल्या आहेत, आणि देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर बर्लिन आहे.

जर्मनी देशाची देशाची राजधानी बर्लिन आहे. येथे मोठ्या प्रमाणत उद्योग व व्यापार केले जातात आणि या देशातील सर्वात मोठे शहर बर्लिन आहे आणि त्याचे आर्थिक केंद्र  फ्रँकफर्ट शहर आहे, आणि सर्वात मोठे शहरी क्षेत्र रुहर आहे. जर्मनी देश अर्थव्यवस्थेसह एक महान शक्तीचा देश आहे.

या देशाची युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, या देशात प्रजासत्ताक लोकशाही आहे. न्याय व व्यवस्था करण्यासाठी संविधान आहे. “एकता, न्याय आणि स्वातंत्र्य” हे या देशाचे ब्रीदवाक्य आहे. आणि “दास लीड देर दॉइचेन” हे या देशाचे राष्ट्रगीत आहे. हा देश एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश आहे.

लोकसंख्या :

जर्मनी देशाची लोकसंख्या 2010 च्या जनगणणेनुसार एकूण 8,17,57,600 ऐवढी आहे, आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 15 व्या क्रमांकावर येतो.

जर्मनी हा देश युरोपियन युनियन मधून सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो. आणि रशियानंतर युरोपमधील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. बौद्ध धर्माचे लोक येथे जास्त प्रमाणत राहतात.

चलन :

जर्मनी देशाचे चलन युरो आहे. येथील स्थानिक लोक या चलनाचा वापर करत असतात. आणि देशाच्या व्यवहारात सुध्दा या चलनाचा वापर होतो. जर्मनी चलन भारतीय चलनाच्या तुलनेत महाग आहे. 1 युरो कॉइन म्हणजे भारतीय 79.80 रुपये होतात.

खेळ :

जर्मनी देशाचा फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या देशात जर्मन फुटबॉल असोसिएशन ही जगभरातील सर्वात मोठी एक क्रीडा संघटना आहे. आणि जर्मन शीर्ष लीग बुंडेस्लिगा सर्व व्यावसायिक खेळांमध्ये 2 ऱ्या क्रमांकावर येतो.

जगातील लीग जर्मन पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये फिफा विश्वचषक जिंकला आहेत. याच बरोबर या देशात हाॅलीबॉल, टेनिस, फुटबॉल, यासारखे अनेक खेळ लोकप्रिय आहेत.

भाषा :

जर्मनी देशाची जर्मन ही मुख्य भाषा आहे, ही भाषा येथे जास्त प्रमाणात बोलली जाते. ही भाषा युरोपियन युनियनच्या 24 अधिकृत आणि कार्यरत भाषांपैकी एक भाषा आहे, आणि युरोपियन कमिशनच्या तीन प्रक्रियात्मक भाषांपैकी एक आहे.

जर्मन ही भाषा युरोपियन युनियनमधील सर्वात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी पहिली भाषा आहे, या देशात 100 स्थानिक भाषा आहेत. देशाच्या व्यवहारात सुध्दा जर्मन आणि इंग्रजी भाषा वापरली जाते. इंग्रजी भाषा येथे कमी प्रमाणात बोलली जाते. पण येथील शालेय शिक्षण आणि महाविद्यालयात ही भाषा शिकली जाते.

आणखी जर्मनीमध्ये डॅनिश, लो जर्मन, लो रेनिश, सोर्बियन, रोमनी, नॉर्थ फ्रिसियन, आणि सेटरलँड फ्रिसियन ह्या भाषा प्रादेशिक भाषा आहेत. तसेच तुर्की, अरबी, कुर्दिश, पोलिश, ग्रीक, सर्बो क्रोएशियन, बल्गेरियन आणि इतर बाल्कन भाषा तसेच रशियन या सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या स्थलांतरित लोकांच्या भाषा आहेत.

इतिहास :

जर्मनी देशाचा इतिहास खूप प्राचीन व ऐतिहासिक इतिहास आहे. अश्मयुगात मानवपूर्व पूर्वज होते. जे 10 दशलक्ष वर्षापूर्वी जर्मनीमध्ये उपस्थित होते. त्यानंतर ते दोन पायांवर चालणारे सर्वात पहिले लोक होते.

प्राचीन मानव किमान 6000 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये उपस्थित होते. येथे चाकाचा आणि अग्निचा शोध लागला. पहिले आधुनिक मानवी जीवाश्म निएंडर व्हॅलीमध्ये सापडले. त्याचप्रमाणे आधुनिक मानवाचे पुरावे स्वाबियन जुरामध्ये सापडले आहेत. युरोपियन कांस्य युगात तयार केली गेली.

जर्मनी देशात 19 व्या शतकातम जगभरातील महामंदीचा जर्मनीला फटका बसला. यामुळे चांसलर हेनरिक ब्रुनिंगच्या सरकारने वित्तीय काटकसरीचे आणि चलनवाढीचे धोरण अवलंब करण्यात आला. ज्यामुळे सन 1932 पर्यत देशातील सुमारे 30 टक्के लोक बेरोजगार झाले. आणि अडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी पक्ष रिचटॅग नंतर या देशातील सर्वात मोठा पक्ष बनला.

नंतर 1932 मध्ये विशेष निवडणूक झाली. नंतर 30 जानेवारी 1933 रोजी हिंडेनबर्गने हिटलरची जर्मनीचा चान्सलर म्हणून नियुक्ती करण्यात आली. राईशस्टाग आगीनंतर एका हुकुमाने मूलभूत नागरी हक्क रद्द केले. नंतर पुढे बर्लिनच्या लढाईत हिटलरने आत्महत्या केली. त्यामुळे जर्मनीने  8 मे 1945 रोजी शरणागती स्वीकारली. आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध थांबले.

व्यवसाय व उद्योग :

जर्मनी देशामध्ये खूप कमी प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. येते प्रामुख्याने गहू, बार्ली, तंबाखू, मका, कापुस यासारखे पीक घेतला जातात. तसेच येथील ग्रामीण भागात व्यवसाय मध्ये पशूपालन व्यवसाय केला जातो. त्यामुळे दुग्धव्यवसाय शेळी, मेंढी, कुकुट पालन असे व्यवसाय केले जातात.

या देशात उद्योग क्षेत्रामध्ये जर्मनीतील ऑटोमोटिव्ह उद्योग जगातील सर्वात स्पर्धात्मक आणि नाविन्यपूर्ण उद्योगांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आणि  उत्पादना नुसार हा देश 4 थ्या क्रमांकाचा उद्योग आहे.

यामध्ये वाहने, यंत्रसामग्री, रासायनिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, विद्युत उपकरणे, फार्मास्युटिकल्स, वाहतूक उपकरणे, मूलभूत धातू, अन्न उत्पादने आणि रबर बनवणे, अशे अनेक उद्योग केले जातात.

वाहतूक व्यवस्था :

जर्मनी देशातील वाहतूक व्यवस्था एकदम चांगल्या प्रमाणत उपलब्ध आहे. जर्मनी हे खंडाचे वाहतूक केंद्र आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात व्यापार केले जातात. आणि ते विदेशात पाठवण्यासाठी विमान सेवा व रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

रस्त्यांचे जाळे युरोपमधील सर्वात दाट आहे. येथील देशाअंतर्गत उद्योगसाठी स्वतःचे खाजगी वाहन व्यवस्था आहे. तसेच देशातील स्थानिक लोकांच्या सेवेसाठी सरकारी बस सेवा उपलब्ध आहे. आणि रेल्वे सेवा सुध्दा या देशात स्थानिक लोकांसाठी चांगल्या प्रमाणत आहे.

हवामान :

जर्मनी देशातील हवामान हे थोडे उष्ण व दमट आहे. बहुतेक ठिकाणी जर्मनीमध्ये समशीतोष्ण हवामान आहे. उत्तरेकडील महासागरापासून ते पूर्वेकडील आणि आग्नेय भागातील बेटा पर्यत थोडे थंड हवामान असते, आणि येथील पर्जन्यसृष्टी ढगाळ असते. आणि या देशातील उन्हाळा उष्ण आणि कोरड्या असतो.

पाऊसाने येथील वातावरण थंड होते. या देशात सागरीवारे वाहत असल्याने येथील हवामान सतत बदल होत असतो. येथील उन्हाळी सरासरी तापमान 25° ते 30° पर्यत राहते आणि वार्षिक पाऊसाची सरासरी दर 500 ते 550 मी मी ऐवढी राहते.

प्राणी व पक्षी :

जर्मनी मध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली क्षेत्र आहे. या देशातील 30% भागात वनक्षेत्राखाली आहे. त्यामधे विविध प्राणी व पक्षी आढळून येतात. येथे प्रामुख्याने प्राण्यांमध्ये रो हिरण, रानडुक्कर, मॉफ्लॉन, कोल्हा, बॅजर, अस्वल, लांडगे, जंगली कुत्रे, यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच येथे काही पक्षी आढळून येतात. काही स्थलांतरित पक्षी आहेत, तर काही स्थानिक पक्षी आहेत.

पर्यटक स्थळ :

जर्मनी देशामध्ये बव्हेरियामधील न्यूशवांस्टीन किल्ला आहे. हा ऐतिहासिक किल्ला आहे, आणि लोकप्रिय सुध्दा या देशातील लोक मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी जात असतात.

जर्मनी देशातील इव्हॅन्जेलिकल चर्च हे या देशातील सर्वात मोठे चर्च आहे. ख्रिचन समाजाचे हे धार्मिक स्थळ आहे आणि लोकप्रिय सुद्धा येथे लोक प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

जर्मनीमध्ये बर्चटेसगाडेन हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अतिशय सुंदर व नैसर्गिक ठिकाण आहे. सुट्टीच्या दिवशी लोक येथे आनंद घेण्यासाठी जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment