फ्रान्स देशाची संपूर्ण माहिती France Information In Marathi

France Information In Marathi फ्रान्स हा देश पश्चिम युरोप आणि अमेरिका आणि हिंदी महासागरातील परदेशातील प्रदेश व अटलांटिक, पॅसिफिक आणि एक आंतरखंडीय स्वतंत्र देश आहे. या देशाची राजधानी पॅरिस आहे. आणि सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र सुध्दा आहे. पॅरिस हे या देशातील सर्वात मोठे शहर आहे. हा देश एक प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो.  तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

France Information In Marathi

फ्रान्स देशाची संपूर्ण माहिती France Information In Marathi

फ्रान्स देशाचे “स्वातंत्र्य समानता बंधुता” हे बोधवाक्य आहे. येथे सर्व नागरिक समान आहेत व स्वतंत्र आहेत, आणि “ला मार्सेलीस” हे या देशाचे राष्ट्रगीत आहे. फ्रान्स देशाने 25 मार्च 1957 रोजी युरोप संघात प्रवेश घेतला होता, या देशाचे स्वतःचे संविधान आहे. जे न्याय व व्यवस्था करते. या देशात मोठे पर्यटक स्थळ आहेत.

विस्तार व क्षेत्रफळ :

फ्रान्स देशाचे एकूण क्षेत्रफळ 6,73,843 ऐवढे आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हा देश जगात 43 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून उत्तर दिशेला उत्तर समुद्र आहे, आणि पश्चिम दिशेला अटलांटिक महासागर आणि आग्नेयेस भूमध्य समुद्र आहे. याच्या जमिनीच्या सीमा ईशान्येला बेल्जियम आणि लक्झेंबर्ग पर्यत आहे. व पूर्वेला जर्मनी आणि स्वित्झर्लंड देश आहेत. तसेच आग्नेय

दिशेला इटली आणि मोनाको देशाच्या सीमा आहेत. आणि दक्षिण आणि नैऋत्यला अँडोरा आणि स्पेन या देशाचा समावेश आहे. दक्षिण आणि आग्नेय दिशेला पायरेनीज, आल्प्स आणि जुरा आहे, आणि पूर्व दिशेला राईन नदी आहे.

लोकसंख्या :

फ्रांस देशाची लोकसंख्या 2010 च्या जनगणनेनुसार 6,70,13,001 ये आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 20 व्या क्रमांकावर येतो. हा देश युरोपमधील तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि युरोपियन युनियनमध्ये सुध्दा आहे.

नैसर्गिक लोकसंख्या वाढीच्या तुलनेने फ्रान्स देश विकसित देशांमध्ये युरोप सर्वात वरचा देश आहे. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. सर्वात जास्त येते ख्रिचन धर्माचे लोक राहतात. बाकी इस्लाम आणि ज्यू धर्माचे लोक व बाकी इतर धर्म आहे.

हवामान :

फ्रान्स देशातील हवामान हे उष्ण व दमट आहे. येथील महानगर प्रदेश तुलनेने मोठा आहे. म्हणून येथील हवामान एकसमान राहत नाही. या देशात उष्ण उन्हाळी भूमध्य हवामा आढळते. हा उन्हाळा अती गरम आणि कोरडा असतो. तर या देशातील हिवाळा सौम्य आणि ओला असतो. येथील उन्हाळी ससासरी तापमान 45° ते 48° असते.

फ्रान्स देशामध्ये सागरी व पठारी वारे वाहतात. या देशातील हिवाळा खूप थंड आणि बर्फाळ असतो. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथील पाऊसाची सरासरी 760 मी.मी.पाऊस पडतो. सतत वातावरण बदलावमुळे याचा परिमाण येथील स्थानिक लोकांवर होतो.

खेळ :

फ्रान्स देशातील फुटबॉल हा लोकप्रिय व राष्ट्रीय खेळ आहे. येथे राष्ट्रीय फुटबॉल क्लब स्पर्धा लीग आहे, आणि फ्रान्स देशाने जगातील काही महान खेळाडू तयार केले आहेत. ज्यात तीन वेळा फिफा वर्ल्ड प्लेयर ऑफ द इयर झिनेदिन झिदान जिंकला आहे. तसेच तीन वेळा बॅलोन डीओर प्राप्तकर्ता मिशेल प्लॅटिनी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आहे.

येथील लोक या खेळात जास्त प्रमाणात सहभागी होतात. त्याच बरोबर येथे टेनिस आणि रग्बी खेळ सुध्दा लोकप्रिय आहेत. या देशाने फुटबॉल स्पर्धेत 1998 आणि 2018 मध्ये दोन फिफा विश्वचषक जिंकले आहे. फ्रान्स देश जगातील सर्वात मोठा वार्षिक क्रीडा स्पर्धा “टूर डी फ्रान्स” आयोजित करते व यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

भाषा :

फ्रान्स देशाची मुख्य भाषा फ्रेंच आहे. येथील लोक या भाषेचा जास्त वापर करतात. ही भाषा लॅटिनमधून आलेली आहे. त्याचबरोबर या देशात आणखी भाषा पण बोलल्या जातात. फ्रान्समध्ये ऑक्सिटन, ब्रेटन, कॅटलान, फ्लेमिश, अल्सॅटियन, जर्मन बोली, बास्क आणि कॉर्सिकन यासारख्या प्रादेशिक भाषा सुध्दा बोलल्या जातात.

येथील देशाचा कामकाजमध्ये आणि विदेशी व्यापार करण्यासाठी या भाषेचा वापर केला जातो. फ्रेंच ही इंग्रजी नंतर जगातील दुसरी सर्वात जास्त अभ्यासली जाणारी परदेशी भाषा आहे. इंग्रजी भाषा येथे कमी प्रमाणात बोलली जाते. येथील शाळा व महाविद्यालये मध्ये ही भाषा शिकवली जाते.

व्यवसाय व उद्योग :

फ्रान्स देशाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथील लोक मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करतात. फ्रान्स देश जगातील प्रमुख कृषी केंद्रांपैकी एक आहे. येथे “जागतिक कृषी पॉवरहाऊस” होते. याचे टोपणनाव जुन्या खंडातील धान्याचे कोठार म्हणून ओळखला जात होते.

येथे निम्म्याहून अधिक क्षेत्रफळ हे शेतजमीन आहे. येथे प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, कापुस, यासारखे पीक घेतले जातात. तसेच येथे भाजीपाला पिके सुध्दा घेतले जाते. शेतीबरोबर येथे पशुपालन व्यवसाय केला जातो. त्यामधे मेंढी, डुक्कर, शेळी आणि कुकुटपालन व्यवसाय केले जातो.

उद्योगमध्ये येथे मोठ्या प्रमाणात कारखाने व कंपन्या उपलब्ध आहेत. यातून येथे रोजगार उपलब्ध होतात. कारखानेमध्ये पोलाद बनवणे. इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणे तसेच प्लॅस्टिक उत्पादन तयार करणे असे अनेक प्रकारचे उद्योग केले जातात, आणि हा माल विदेशात पाठवला जातो. शेतीचे अवजार बनवणे असे अनेक उद्योग केलं जातात.

वाहतूक व्यवस्था :

फ्रान्स देशामध्ये वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. येथे युरोपियन खंडातील सर्वात विस्तृत नेटवर्क आहे.  येथील राजधानी पॅरिस प्रदेश हा रस्ते आणि महामार्गाच्या दाट जाळ्याने व्यापलेले आहे. जो देशाच्या सर्व भागांशी जोडला गेला आहे, यातून व्यापार केले जातात.

तसेच येथील स्थानिक लोकांसाठी खाजगी व सार्वजनिक बस सेवा उपलब्ध आहे. जो एकदम सुरक्षित प्रवास मानला जातो. बाकी लोक स्वतःचे मोटारसायकल आणि मिनीगाड्याचा वापर करतात. फ्रान्स देशामध्ये लोकांसाठी व व्यापार करण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. तसेच विदेशी व्यापारसाठी विमानसेवा आणि जहाज सेवा आहे.

इतिहास :

फ्रान्स देशाचा इतिहास मध्ययुगीन व ऐतिहासिक आहे. प्राचीन युगात येथील आयोनियन ग्रीक लोकांनी भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर मसालिया वसाहत स्थापन केली. नंतर ते फ्रान्सचे सर्वात जुने शहर बनले आहे. काही गॅलिक सेल्टिक जमाती पूर्व आणि उत्तर फ्रान्सच्या काही भागांमध्ये घुसल्या होत्या. नंतर इ स पू 5 व्या आणि 3 व्या शतकाच्या दरम्यान उर्वरित देशामध्ये पसरत गेला. त्यानंतर गॉलची संकल्पना या काळात उदयास आली, आणि जी राईन अटलांटिक महासागर या दरम्यानच्या सेल्टिक वसाहतीच्या प्रदेशाशी संबंधित आहे.

पायरेनीज आणि भूमध्य आधुनिक फ्रान्सच्या सीमा ही प्राचीन गॉलशी संबंधित आहेत. ज्याचे सेल्टिक गॉल्सचे वास्तव्य होते. तेव्हा गॉल हा एक समृद्ध देश होता. हळुहळू या देशाचा विकास होत गेला.

या देशात 19व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्सने आपल्या राजकीय आणि लष्करी शिखरावर पोहोचले होते. आणि युरोप खंडातील बराचसा भाग ताब्यात घेतला, आणि पहिले फ्रेंच साम्राज्य स्थापन केले. फ्रेंच क्रांतिकारक आणि नेपोलियन युद्धांनी युरोपियन आणि जागतिक इतिहासाचा मार्ग तयार केला. आणि साम्राज्याच्या पतनाने सापेक्ष अधपतनाचा काळ सुरू झाला.

ज्यामध्ये 1870 मध्ये फ्रँको प्रुशियन युद्धादरम्यान फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक स्थापन होय पर्यत फ्रान्सने सरकारचा गोधळ झाला. त्यानंतर या दशकांमध्ये आशावाद सांस्कृतिक आणि वैज्ञानिक भरभराटीचा काळ दिसू लागला. फ्रान्स पहिल्या महायुद्धातील प्रमुख सहभागीपैकी एक देश होता.

ज्यातून तो मोठ्या मानवी आणि आर्थिक किंमतीवर विजयी प्राप्त झाला आणि हे द्वितीय विश्वयुद्धातील मित्र राष्ट्रांपैकी एक राष्ट्र होते. नंतर लवकरच 1940 मध्ये धुरीने ते ताब्यात घेतले आणि आपले राज्य स्थापन केले.

चलन :

फ्रान्स देशाचे चलन युरो आहे. येथील स्थानिक आणि शासकीय कामामध्ये या चलनाचा वापर केला जातो. भारतीय चलनाच्या तुलनेत एक युरो कॉइन म्हणजे 80.74 रुपये होतात. हे सर्वात महाग चलन मानले जाते.

पर्यटक स्थळ :

फ्रान्स देशात फ्रेंच हे किल्ले ऐतिहासिक व लोकप्रिय आहेत. चिनॉन, शॅटो डी अँजर्स हे किल्ले पाहण्यासाठी लोक देशा विदेशातून येतात. या देशात ख्रिचन समाजाचे सर्वात लोकप्रीय चर्च आहे. या समजतील लोक येथे प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment