सरकारी योजना Channel Join Now

फायनान्स विषयी संपूर्ण माहिती Finance Information In Marathi

Finance Information In Marathi पूर्वीच्या काळी कुठलेही कार्य करायचे असेल तर आपल्याजवळ असणाऱ्या पैशांचा हिशोब बघितला जात असे. मात्र आजकाल अनेक लोक पैसा नसला तरी देखील कर्ज काढून विविध कार्य करत असतात. यातील काही लोक मौजमजेसाठी कर्ज घेणारे असले तरी देखील बरेचसे लोक विविध उत्पादक कार्य करण्यासाठी कर्ज घेत असतात. या कर्ज घेतलेल्या किंवा स्वतःकडे असलेल्या सर्व पैशांची व्यवस्थापन करणे म्हणून फायनान्स या घटकाला ओळखले जाते.

Finance Information In Marathi

फायनान्स विषयी संपूर्ण माहिती Finance Information In Marathi

अनेक नवनवीन उद्योग किंवा स्टार्टअप तयार केले जातात, या नवनवीन कल्पनांसाठी पैसा आवश्यक असतो. आणि या पैशाची उभारणी करण्याकरिता अनेक लोकांकडे विचारणा केली जाते. या अंतर्गत काही भाग हा त्या फायनान्सर व्यक्तीला दिला जातो, त्याला भाग भांडवल म्हणून ओळखले जाते.

आजच्या भागामध्ये आपण या फायनान्स बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, व या फायनान्स अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या निधीची माहिती, व त्याचे व्यवस्थापन देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया फायनान्स विषयीच्या या माहितीपर प्रवासाला…

फायनान्स म्हणजे काय:

फायनान्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पैशांचा एक प्रचंड मोठा महासागर आहे. ज्यातून कुठल्याही कामासाठी पैसे घेतले जाऊ शकतात. मात्र पुन्हा हे पैसे परत करणे देखील तेवढेच बंधनकारक असते. कुठल्याही स्वरूपाचे कार्य करायचे असेल व्यवसाय चालवायचा असेल किंवा उत्पादन घ्यायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची किंवा निधीची तरतूद करणे, व या सर्व निधीला व्यवस्थित रित्या व्यवस्थापित करणे या सर्व गोष्टींना एकत्रित रित्या फायनान्स म्हणून ओळखले जाते.

फायनान्स सोबत भांडवल व चलनी पैसा अतिशय जवळचा संबंध दाखवत असतात. कारण कुठलाही नवीन व्यवसाय उभारायचा असेल, किंवा उत्पादन घ्यायचे असेल त्याचबरोबर स्टार्टअप सुरू करायचे असेल तर त्यासाठी पैशाची फारच मोठी आवश्यकता असते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये अनेक व्यवसायिक लोकांकडे या पैशाची कमतरता आढळून येत असते.

मात्र पुढील काळामध्ये हा उद्योग व्यवसाय किंवा स्टार्टअप चांगला नफा मिळवून देईल अशी ज्या लोकांना अपेक्षा असते, ते लोक त्यांच्याकडील पैसा या व्यवसायांमध्ये खर्च करण्यासाठी देत असतात. आणि त्या बदल्यामध्ये एकतर व्याज स्वरूपात पैसे वसूल केले जातात, किंवा त्या कंपनी किंवा स्टार्टअप मध्ये काही भाग भांडवल घेत असतात. ज्याप्रमाणे कंपनीची वाढ होईल त्या पद्धतीने यांच्या भाग भांडवलामध्ये देखील वाढ होत असते, ज्याला कुठलेही प्रकारची मर्यादा नसते.

फायनान्स चे प्रकार:

फायनान्सचे मुख्य तीन प्रकार पडत असतात. ज्यामध्ये वैयक्तिक फायनान्स, सार्वजनिक फायनान्स, आणि कॉर्पोरेट फायनान्स या तीन प्रकारांचा समावेश होत असतो.

वैयक्तिक फायनान्स म्हणजे वैयक्तिक पातळीवर घडवून आणलेल्या पैशांच्या किंवा निधीच्या व्यवस्थापनाची पद्धती होय. यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार आणि पद्धतीनुसार पैसे गुंतवत असतो.

कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे एखाद्या वैयक्तिक व्यक्तीच्या ऐवजी कुठलीही संस्था किंवा व्यवसाय धारक या निधीची तरतूद करण्यासह त्याचे व्यवस्थापन देखील करत असतात. त्याचबरोबर या निधीच्या वापराविषयी आणि उत्पन्नाविषयी संपूर्ण निर्णय घेण्याची कार्ये देखील या संस्था किंवा व्यवसाय मार्फतच केले जात असते.

पब्लिक फायनान्स:

फायनान्स म्हणजे पैशाचे किंवा निधीची व्यवस्थापन करणे होय. सरकार चालवायची असेल, तर त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पैशांची किंवा निधीची आवश्यकता असते, आणि पैसा किंवा निधी आला म्हणजे त्याला व्यवस्थापन करणे देखील ओघाने आलेच. त्यामुळे शासकीय पातळीवर अनेक लोकांकडून कर गोळा करून असा पैसा उभारला जातो.

ज्या अंतर्गत सरकार चालविले जाते. त्याचप्रमाणे विविध सोयी सुविधा निर्माण करणे, इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे, या कामासाठी देखील या निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो. या निधीच्या माहितीकरिता दरवर्षी अंतिम बजेट सादर केले जात असते. त्या अंतर्गत पुढील काळामध्ये केल्या जाणाऱ्या खर्चाबद्दल आणि येणाऱ्या उत्पन्नाबद्दल संभाव्य माहिती दिलेली असते. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील या गोष्टींची माहिती होण्यास मदत मिळत असते.

फायनान्स कंपनी:

पूर्वीच्या काळी फायनान्स किंवा वित्त हे अनियंत्रित स्वरूपाचे असले तरी देखील आज काय याला कायदेशीर मान्यता आहे व याचे योग्य रीतीने व्यवस्थापन देखील केले जात असते. यासाठी आज अनेक फायनान्स कंपन्या तयार झालेल्या असून, त्यांच्या माध्यमातून निधी वाटप करणे, कर्ज मिळवणे, गुंतवणुकी करणे, इत्यादी प्रकारची कार्य केली जात असतात.

फायनान्स कंपन्या विविध गोष्टींच्या खरेदी पासून अगदी मोठ्या उद्योग व्यवसायांच्या उभारणीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये आर्थिक मदत करत या सर्व पैशांचे नियोजन करत असतात. या फायनान्स कंपन्या आजकाल चांगला नफा मिळवत असून, सर्वत्र या कंपनीचा चांगला बोलबाला आहे.

फायनान्स चे फायदे:

कर्जाच्या ऐवजी फायनान्स प्रक्रिया निवडण्यामागे अनेक फायदे असतात. व्यवसाय चालवण्यासाठी ताजा पैसा उपलब्ध होतो, आणि तो कुठे गुंतवावा हा सर्वस्वी तुमचा निर्णय ठरू शकतो. त्याचबरोबर या निर्णयामध्ये तुम्हाला गुंतवणूकदार किंवा भाग भांडवलदार मदत देखील करू शकतात.

त्याचबरोबर कर्ज घेतल्यानंतर त्याचे व्याज मोठ्या प्रमाणावर वाढत असते, आणि हे कर्ज पुन्हा परतफेड करण्याची टांगती तलवार देखील डोक्यावर कायम असते. मात्र फायनान्स प्रक्रिया निवडल्यामुळे गुंतवणूकदार कंपनीमध्ये सहभागी होत असतात, त्यामुळे कंपनीच्या वाढीसाठी ते देखील प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला पाठिंबा देखील मिळत असतो. शिवाय कर्जासारखी येथे परतफेड देखील करण्याची आवश्यकता भासत नाही.

निष्कर्ष:

फायनान्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, कुठल्याही प्रकारचे कार्य करण्यासाठी जुळवलेला किंवा जमवलेला पैसा होय. या जुळवलेल्या पैशांचे विविध मार्ग असतात, त्या मार्गानुसार या फायनान्सचे विविध प्रकारचे पडले जातात. फायनान्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या कंपन्या आज अस्तित्वात असून, पूर्वीच्या काळापासून फायनान्स ही प्रक्रिया अस्तित्वात आहे.

मात्र त्याचे स्वरूप काहीसे वेगळे होते. पूर्वीच्या काळी मुख्यतः वैयक्तिक स्वरूपावरील फायनान्स मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे. यामध्ये सावकारी देखील आघाडीवर होती. याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालेले आहे. फायनान्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, कुठल्याही गोष्टीसाठी घेतलेला पैसा काही रिटर्न सह परत करणे होय.

यामध्ये विविध प्रकार समाविष्ट असतात, जसे की व्याज स्वरूपात पैसा परत करणे किंवा ज्या उद्योग व्यवसायासाठी हा निधी उभारला असेल त्या उद्योग व्यवसायामध्ये भागधारक करून घेणे होय. आजच्या भागामध्ये आपण या फायनान्स विषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, फायनान्स म्हणजे काय, त्याचे किती प्रकार पडतात, त्यामधील वैयक्तिक फायनान्स, कॉर्पोरेट फायनान्स, आणि सार्वजनिक फायनान्स या संकल्पना काय आहेत, फायनान्स कंपनी म्हणजे काय, ती काय कार्य करते, फायनान्स प्रणाली कशा रीतीने चालत असते, या सर्व बाबतीत माहिती घेतलेली आहे.

FAQ

फायनान्स हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

फायनान्स हा एक फ्रेंच भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ वित्त व्यवस्थापन असा होतो.

फायनान्सचे किती प्रकार पडत असतात?

फायनान्सचे मुख्यतः तीन प्रकार पडत असतात.

फायनान्सचे मुख्य तीन प्रकार कोणकोणते आहेत?

फायनान्स चे मुख्य तीन प्रकार बघायचे झाल्यास त्यामध्ये वैयक्तिक फायनान्स, कॉर्पोरेट फायनान्स, आणि सार्वजनिक फायनान्स यांचा समावेश होतो.

पब्लिक फायनान्स मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो?

पब्लिक फायनान्स मध्ये कर गोळा करण्याचा समावेश होतो. ज्या अंतर्गत सरकारे चालवली जात असतात.

पूर्वीच्या काळी फायनान्स चे स्वरूप कशाप्रकारे होते?

सर्वात जुन्या कालावधीमध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. त्यानंतर ज्यावेळेस पैशाच्या अस्तित्वाची नोंद झाली, त्यानंतर हळूहळू फायनान्स क्षेत्र देखील विस्तारू लागले. पूर्वीच्या काळी सावकारी फायनान्स प्रक्रिया अस्तित्वात होती.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment