सरकारी योजना Channel Join Now

जिऱ्याची संपूर्ण माहिती Cumin Seeds Information In Marathi

Cumin Seeds Information In Marathi जीरा हा पदार्थ आपल्या रोजच्या वापरातील आहे. अगदी सकाळी पहिल्या पोह्यांच्या फोडणीमध्ये सर्वप्रथम जीरा घातला जातो. कुठलीही भाजी असू देत फोडणीला जिरा हा हवाच. जीरा हा एक बियांच्या स्वरूपातील मसाला असून, त्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. भूमध्य सागरीय उगमाचा हा पदार्थ नैऋत्य आशियाई प्रदेशांमध्ये एक अन्न म्हणून देखील मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

Cumin Seeds Information In Marathi

जिऱ्याची संपूर्ण माहिती Cumin Seeds Information In Marathi

जीरा हा अतिशय अप्रतिम चव असणारा मसालाचा पदार्थ असून प्रत्येक भारतीय पातळ भाजी मध्ये तसेच कोरड्या भाजीमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा एक गरम स्वरूपाचा मसाला असून, अनेक वर्षांपासून त्याचा औषधी वापर देखील केला जात आहे.

ज्या लोकांना पचनाशी संबंधित आजार किंवा पोटाचे अनेक विकार असतील त्यांच्यासाठी जिऱ्याचे सेवन करण्याचे सांगितले जाते. जिऱ्याच्या फायद्यांमध्ये वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रणात आणणे, कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादित ठेवणे, इत्यादी फायद्यांचा समावेश होतो.

चला तर मग आजच्या भागामध्ये आपण या जिर्‍याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.…

जीरा म्हणजे काय:

जीरा हा एकच सामान्य मसाल्यातील पदार्थ आहे. जो तपकीरी रंगांमध्ये आढळून येतो. मात्र काही जिरे हे काळ्या रंगांमध्ये देखील असतात, जे महाग असतात.

पांढऱ्या रंगाचे पुंजके असणारे हे जिऱ्याचे झाड पिकल्यानंतर बियांमध्ये रूपांतरित होतात. या वनस्पती ६० ते ९० सेंटीमीटर अर्थात दोन ते तीन फूट उंचीपर्यंत वाढतात. त्या फुलांचा रंग गडद, निळा, अथवा जांभळा असतो. यामध्ये दंडगोलाकार आकाराच्या छोट्याशा बिया असतात.

ज्यांचा आकार साडेचार ते पाच मिलिमीटर इतका असतो. यामधून तीव्र स्वरूपाचा तिखट वास येत असतो. साधारणपणे जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये जिरे काढणीला येत असतात.

जिऱ्यांचे विविध प्रकार:

जिऱ्याचे त्यांच्या रंगावरून आणि वापरावरून प्रकार पडत असतात. ज्यामध्ये पांढरे जिरे, काळे जिरे, आणि जंगली जिरे इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. पांढरे जिरे शक्यतो भारतामध्ये वापरले जात नाही. या प्रकारच्या जिऱ्यांमध्ये जीवनसत्व अ व जीवनसत्व क मोठ्या प्रमाणावर असते.

दुसरा प्रकार हा काळा जिऱ्यांचा असतो. या जिर्‍यांची चव थोडीशी कडवट लागू शकते, आणि हे जिरे अधिक उष्ण स्वरूपाचे देखील असतात. त्यामुळे प्रामुख्याने या जिऱ्यांचा वापर हिवाळ्यामध्ये केला जातो. मुख्यत्वे हे जिरे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवणे, आणि पोटाच्या समस्यांवर उपचार करणे याकरिता वापरले जातात. तर पुढील प्रकार म्हणजे जंगली जिरे होय.

अतिशय जुनाट सर्दी व खोकला, नाकामधून रक्त येणे, किंवा नाकांच्या विविध आजारांसाठी जंगली जिऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सोबतच ज्यांच्या डोक्यामध्ये उवा असतील त्या प्रादुर्भावावर इलाज करण्याकरिता जंगली जिऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे:

जीरा या पदार्थांमध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. आणि हे जीवनसत्व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. हे आपल्याला माहितीच आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाली आहे, अशा लोकांसाठी जिऱ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून विटामिन सी पुनर्प्रस्थापित होऊन शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाईल.

त्यासोबतच जिऱ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे, शरीरावरील जुनाटपेशी काढून, शरीराला व त्वचेला नवचैतन्य देणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवणे याकरिता देखील जिऱ्यांचा वापर होतो. केसांच्या आजारांकरिता जिऱ्याचा वापर मोठा लाभदायी ठरतो. कारण जिऱ्यामध्ये थायमोक्विनॉन नावाचा घटक असतो, जो दम्याच्या आजारावर उपचार करण्यास अतिशय फायदेशीर असतो. तसेच जिरा हे जंतुनाशक म्हणून देखील कार्य करत असते.

ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत असेल, अशा लोकांना वजन कमी करण्याकरिता सुद्धा जीरा खाण्याचा सल्ला दिला जातो. कॉम्प्लिमेंटरी थेरेपीस ऑफ अ क्लिनिकल या २०१४ साली प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लठ्ठ लोकांसाठी जिऱ्याच्या पावडरचा खूपच सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे सांगितले होते.

याच बरोबरीने पोट फुगण्याच्या समस्यांना दूर करण्याकरिता देखील जिऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यासाठी गॅसवर एक कप पाणी उकळत ठेवावे, त्यामध्ये थोडीशी बडीशेप आणि एकच चिमूट जिरे घालून त्यामध्ये आल्याची पावडर व समुद्री मीठ घालावे. काही वेळ हे मिश्रण मंद आचेवर उकळून घ्यावे, आणि गाळून घेऊन थोडेसे कोमट असतानाच प्यावे. तरीही ही समस्या जाणवत असेल तर पुन्हा एकदा ही प्रक्रिया करावी.

लहान मुलांना पोटात दुखण्याची समस्या जाणवत असेल तर त्यावेळी एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा जिरे टाकून अर्ध्या तासासाठी हे मिश्रण झाकून ठेवावे. त्यानंतर गाळून आपल्या मुलांना एक ते दोन चमचे प्यायला द्यावे.

निष्कर्ष:

जिरा हा एक भारतीय खाद्यपदार्थातील मसाल्याचा पदार्थ असून तो अतिशय उष्ण स्वरूपाचा आहे. यामुळे पचनाशी संबंधित आजार बरे होण्याबरोबरच जेवणाला एक अप्रतिम स्वरूपाची चव येते. भारतीय गृहिणीचा असा एकही दिवस जात नसेल ज्या दिवशी जिऱ्याचा वापर केला नाही. त्यामुळे जीरा किती मोठ्या प्रमाणावर वापरला जात असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

आज आपण जीरा बद्दल माहिती पाहिली, त्यामध्ये जिरा म्हणजे काय त्याचे प्रकार काय असतात, जीरा कशा पद्धतीने खावा, त्याचे आरोग्यदायी काय फायदे आहेत, तसेच याच्या सेवनामुळे काही तोटे होतात का? आणि होत असतील तर काय? याबाबत माहिती बघितली. फायद्यांमध्ये त्वचेच्या श्वसनाच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या दृष्टिकोनातून आपण माहिती बघितलेली आहे.

FAQ

जिऱ्याचे रोजच्या आहारात सेवन केले जाऊ शकते का?

मित्रांनो, भारतीय खाद्यपदार्थांमध्ये रोज जिऱ्याचा वापर केला जातो, मात्र तो थोड्याशा प्रमाणावर. थोड्या प्रमाणावर जिऱ्याचे सेवन केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. मात्र डायरेक्ट जिरे खाणे आणि तेही मोठ्या प्रमाणावर यामुळे किडनी आणि यकृत इत्यादी अवयवांना हानी पोहोचत असते. मोठ्या प्रमाणावर जिरा खाल्ला तर पोटाच्या उष्णतेचे देखील आजार उद्भवू शकतात.

जीरा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे?

जीरा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्युमिनम सायमिनम असे असून, जगभरात प्रत्येक खाद्यपदार्थाला चव मिळावी याकरता जिऱ्यांचा वापर केला जातो. औषधासाठी मात्र याला भाजून किंवा चूर्ण केले जाते.

जीरा या मसाल्याच्या खाद्य पदार्थाचा उगम कोठे झाल्याचे सांगितले जाते?

जीरा या मसाल्यातील खाद्यपदार्थाचा उगम युरोप आफ्रिका आणि आशिया या खंडांमध्ये झाला असल्याचा उल्लेख आढळतो.

जिरे कशासाठी चांगले समजले जातात?

मसाल्यामध्ये वापरण्यास जिरे अतिशय उत्तम समजले जातात, यामध्ये अनेक घटक असतात, ज्यामुळे पचनाला मदत मिळते. तसेच शरीराला लोह शोषून घेण्यासाठी मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवतानाच, कोलेस्ट्रॉल आणि वजन यांना देखील नियंत्रणात ठेवण्याचे जीरा कार्य करत असते.

मधुमेही रुग्णांसाठी जिऱ्याचे सेवन कशा पद्धतीने करण्याचे सुचविले जाते?

मधुमेही रुग्णांसाठी आठ चमचे काळ्या रंगातील जिरे घ्यावेत. त्यानंतर त्यांना चांगले व्यवस्थित भाजून घ्यावे, आणि त्याची पावडर करावी. ही पावडर रोज अर्धा चमचा एका ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये कालवून घ्यावी. हे दिवसातून दोनदा करावे. काही महिन्यानंतर मधुमेही रुग्णांना बराच फरक दिसून येईल.

आजच्या भागामध्ये आपण जीरा या भारतीय खाद्य संस्कृतीच्या एका मसाल्याच्या पदार्थाबद्दल माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्ही कमेंट मध्ये जाणून घेण्यास अतिशय उत्सुक आहोत, तर तुम्हीही पटापट कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तसेच काही सूचना किंवा माहितीमध्ये सुधारणा असतील तर त्याही कळवा. तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत केले जाईल. आणि एक छोटीशी विनंती म्हणजे, ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.

 धन्यवाद…

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment