Best Gautam Buddha Suvichar In Marathi गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते.
गौतम बुद्ध यांचे अनमोल सुविचार Gautam Buddha Suvichar In Marathi
आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय.
आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.
आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.
जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.
पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.
पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.
पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.
भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.
वैर प्रेमाने जिंकावे.
शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, माणसे सगळी सारखीच आहेत.
सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.
स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi