कोरफड विषयी संपूर्ण माहिती Aloevera Information In Marathi

Aloevera Information In Marathi आज काल आयुर्वेदिक उपाय किंवा औषधे फार प्रचलित झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशी औषधे बनवणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय सुरू झालेला आहे. यातील कोरफड ही औषधी वनस्पती अगदी सौंदर्य प्रसाधनापासून शरीरातील अंतर्गत समस्यांना दूर करण्यामागे अतिशय मोलाची भूमिका बजावत असते.

Aloevera Information In Marathi

कोरफड विषयी संपूर्ण माहिती Aloevera Information In Marathi

या कोरफडीचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत, त्यामुळे संपूर्ण भारतभर कोरफडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये देखील या कोरफड वनस्पतीचा वापर आणि लागवड केली जाते. अतिशय रसाळ स्वरूपाची ही वनस्पती जेल बनवण्यासाठी वापरली जाते, त्याचबरोबर अनेक कुष्ठरोगांसारख्या घातक आजारांमध्ये देखील याचा वापर केला जातो. अशा या सर्वगुणसंपन्न आयुर्वेदिक औषधी समजल्या जाणाऱ्या कोरफड विषयी आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत…

नावकोरफड
इंग्रजी नावएलोवेरा
गुणधर्मरसाळ व थंड
वापरसौंदर्यप्रसाधने पोटांच्या समस्या इत्यादी औषधांमध्ये
स्वरूपकाटेरी छोटेसे झुडुप

एक आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाणारी कोरफड एक उत्तम सौंदर्य प्रसाधन, अँटीसेप्टिक गुणधर्म असणारी आणि एंटीबॅक्टरियल गुणधर्म असणारी असून, विटामिन ए व फॉलिक ऍसिड इत्यादीने भरगच्च भरलेली असते. शरीरासाठी एक टॉनिक म्हणून कार्य करणारी ही वनस्पती पचन संस्था सुधारणे, मधुमेहाला आळा घालणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, इत्यादी गोष्टी मध्ये फायदेशीर ठरते.

या कोरफडीच्या प्रत्येक ठिकाणानुसार असंख्य प्रजाती आढळून येत असतात. ज्यामध्ये बारबाडेन्सिस ही प्रजाती मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी प्रजाती आहे. त्याचबरोबर वैद्यकीय वापरामध्ये याच प्रजातीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कोरफडीच्या प्रजातीनुसार त्याच्या पानांचा आकार व स्वरूप वेगवेगळे असते.

त्याचबरोबर रंगांमध्ये देखील विविध गुणधर्म दिसून येतात. काही प्रजातींची पाने ही अतिशय लांब, तलवारीसारखी तर काही वनस्पतींची पाने बैलांच्या शिंगाप्रमाणे असतात. काही अतिशय पातळ तर काही भरगच्च झाड स्वरूपाची असतात. पाण्याचे प्रमाण अतिशय जास्त असणारी ही वनस्पती गडद हिरव्या रंगांमध्ये असली तरी देखील काही प्रजाती काहीशा करड्या किंवा लालसर तांबूस रंगाच्या देखील आढळू शकतात.

तर काही प्रजातींच्या पानांवर पांढऱ्या ठिपक्यांच्या ओळी देखील दिसून येत असतात. शक्यतो काटेरी असणारी ही पाने आतून मात्र रसाळ असतात. या कोरफडीची क्लाइंबिंग एलोवेरा ही देखील एक प्रजाती असून, अतिशय विस्मयकारक म्हणून या प्रजातीला ओळखले जाते. त्याचबरोबर काही प्रजाती अतिशय बुटक्या तर काही अतिशय उंच वाढू शकतात.

कोरफडीची अवघ्या दोन ते तीन इंच वाढणारी प्रजाती म्हणून देस्कॉइंगसीई ही प्रजाती ओळखली जाते. कोरफडीची वनस्पती उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये किंवा वसंत ऋतूमध्ये आपल्या फुलांची निर्मिती करत असते, ज्यांचा रंग केशरी ते पिवळसर असतो. कमी पाण्याच्या प्रदेशांमध्ये वाढणारी प्रजाती ही रंगाने थोडीशी लालसर असते, आणि हा लालसर रंग सूर्यप्रकाशामध्ये अतिशय उठून दिसत असतो.

कोरफडीचे फायदे:

कोरफड ही सर्वगुणसंपन्न आणि विविध प्रकारे वापरात आणली जाऊ शकणारी वनस्पती आहे. याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे अतिसार कमी करणे, किंवा ऍसिडिटी घालविणे हा आहे. अनेक लोक ऍसिडिटी च्या समस्येवर मात करण्याकरिता कोरफड या वनस्पतीचा गर सकाळी रिकाम्या पोटी खाणे पसंत करत असतात. त्याचबरोबर ज्या लोकांना बद्धकोष्ठता जाणवत आहे, अशा लोकांना कोरफड सेवन खूपच फायदेशीर सिद्ध झालेले आहे.

ज्या लोकांच्या रक्तामध्ये साखरेचे अर्थात ग्लुकोजचे प्रमाण वाढते, त्यांना मधुमेहाचा त्रास जाणवत असतो. त्यातही ज्यांना टाईप दोन प्रकारचा मधुमेह आहे, त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याकरिता या कोरफड वनस्पतीचा खूपच फायदा दिसून येत आहे. याबाबत उंदरांवर एक संशोधन केले गेले होते, त्यातून मधुमेही रुग्णांवर कोरफडीच्या पानांचा फायदा दिसून आलेला आहे.

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असले, तरी देखील कोरफड सेवन या प्रमाणाला मोठ्या पातळीवर कमी करू शकते. त्याचबरोबर यकृतामधील कोलेस्ट्रॉलचे पातळी देखील कमी करण्यामध्ये कोरफडचे मोठे योगदान आहे.

कोरफडीचे नियमित सेवन मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त असते. मेंदूमध्ये आढळून येणाऱ्या विविध आजारांकरिता कोरफड उपयुक्त असते, त्याचबरोबर मेंदूची स्मरणशक्ती वाढविण्यामध्ये देखील कोरफड अतिशय फायदेशीर समजली जाते. मात्र मेंदूसाठी कोरफडीचे सेवन करताना तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.

कोरफडीमुळे कर्करोग व हृदयरोग यांसारख्या दुर्धर आजारांवर देखील मात केली जाऊ शकते. कोरफडीच्या जेलमध्ये असणारे कार्डिओ प्रोटेक्टेड गुणधर्म हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करत असतात.

वातप्रकृती आढळणाऱ्या किंवा संधिवात असणाऱ्या रुग्णांना कोरफड सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. एका संशोधनानुसार ऑस्टियोअर्थाइटिस सारख्या आजारांमध्ये देखील कोरफड फारच गुणकारी आहे.

दाताचे आरोग्य सुधारण्याबरोबरच तोंडाला येणाऱ्या दुर्गंधी मध्ये कोरफड खूपच प्रभावी समजली जाते. त्याचबरोबर तोंडात आढळणारे विविध सूक्ष्मजीव जंतू कमी करण्यामध्ये कोरफड फारच फायदेशीर आहे.

कोरफड ही एक उत्तम सुंदर प्रसाधन म्हणून वापरली जात असते, त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविणे, मुरूम किंवा फोड येऊ न देणे, या मुरुमांच्या डागांचे प्रमाण कमी करणे, त्वचेला ओलावा किंवा मॉइश्चरायझिंग प्रदान करणे, इत्यादी फायदे कोरफड पासून होत असतात.

कोरफड या वनस्पतीचा वापर विविध पद्धतीने केला जाऊ शकतो, ज्यामध्ये कोरफडीचा रस पोटामधून घेतला जाऊ शकतो. त्यामध्ये मध देखील मिक्स केला जाऊ शकतो. कोरफड दात घासण्यासाठी, चेहऱ्यावर लावण्यासाठी, किंवा जखमांवर देखील वापरले जाते. कोरफडीचे जेल हे थंडावा प्रदान करणारे असल्यामुळे, शरीरावर लावल्यास अतिशय फायदा होत असतो.

शहरामध्ये कोरफड उपलब्ध नसेल तर तुम्ही अधिक काळासाठी तिला फ्रिजमध्ये देखील ठेवून वापरू शकता.

निष्कर्ष:

कोरफड अतिशय उत्तम आयुर्वेदिक व औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कोरफडीचे अगणित असे फायदे आहेत. अगदी बाह्य शरीराला शुद्ध करण्यापासून, अंतर्गत आजारांवर मात करणे यासाठी कोरफड ही वनस्पती ओळखली जाते. अनेक ठिकाणी कोरफड मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्तरावर देखील लागवड केली जाते.

आजच्या भागामध्ये कोरफडीच्या बद्दल विविध माहिती बघताना, या कोरफडीमध्ये असणारी विविध पौष्टिक तत्वे, त्याच्या वेगवेगळ्या जाती, कोरफड सेवनाचे किंवा वापरण्याचे फायदे, कोरफडीचा वापर कसा करावा, कोरफड बऱ्याच कालावधीसाठी ताजी ठेवण्यासाठी काय करावे, कोरफडीचा वापर करताना घ्यावयाच्या दक्षता, कोरफड वापराने होणारे विविध तोटे, इत्यादी माहिती बघण्यासह नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील वाचलेले आहेत.

FAQ

कोरफडीच्या वनस्पतीला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

कोरफडीच्या वनस्पतीला इंग्रजी मध्ये एलोवेरा या नावाने ओळखले जाते.

कोरफड या वनस्पतीचे काय फायदे आहेत?

कोरफड ही बहुगुणी स्वरूपातील वनस्पती असून, वजन कमी करणे, ऍसिडिटी, मधुमेह, अन्न पचविणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, मेंदूचे आरोग्य सुधारणे, हृदयरोगाला आळा घालणे, छातीतील जळजळ दूर करणे, संधीवातावर उपयोगी ठरणे, दातांचे आरोग्य सुधारणे, जखमा बऱ्या करणे, शरीराला थंडावा प्रदान करणे, सुरकुत्या घालवणे इत्यादी उपयोग केले जातात.

कोरफड जास्त कालावधी करता वापरात यावी याकरिता कशा रीतीने साठवली जावी, किंवा ताजी ठेवावी?

कोरफड ही वनस्पती सामान्य स्थितीमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकते, त्यामुळे प्लास्टिक थैलीमध्ये बांधून व्यवस्थितरीत्या फ्रीजमध्ये ठेवली तर कोरफड अनेक दिवस वापरली जाऊ शकते. त्याचबरोबर कोरफड जेल गोठवून देखील ठेवले जाऊ शकते.

कोरफड गर पोटातून घेण्याबद्दल काय खबरदारी घ्यावी?

कोरफडीचा गर हा आरोग्यासाठी चांगला समजला जात असला, तरी देखील लहान मुलांना यामुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे लहान मुलांना कधीही हा गर देण्यात येऊ नये.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफड कशा रीतीने वापरली जाते?

कोरफड ही थंड प्रकृतीची असण्याबरोबरच, जळजळ किंवा दाह कमी करण्यामध्ये देखील उपयुक्त आहे. त्यामुळे कोरफड पासून तयार करण्यात आलेले जेल सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरले जाते.

धन्यवाद…!

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment