group

अकोला जिल्ह्याची संपूर्ण माहिती Akola District Information In Marathi

Akola District Information In Marathiकोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा एखादी व्यक्ती जोडलेली असते. अकोला या शहराशी देखील अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.  त्यानेच हे शहर वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले. तर चला मग पाहूया अकोला या जिल्हा विषयी विस्तृत माहिती.

Akola District Information In Marathi

अकोला जिल्ह्याची संपूर्ण माहिती Akola District Information In Marathi

जिल्ह्याचे क्षेत्रफळ :

अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,431 चौ.कि.मी असून लोकसंख्या 16,30,239 इतकी आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती  प्रशासकीय विभागात येतो.

1 जुलै, 1998 रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस  अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

अकोला जिल्ह्यातील तालुके :

अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी,  मुर्तिजापूर, अकोट व तेल्हारा.

हवामान :

जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा फार कडक असतो.  मे महिन्यात तापमान महत्तम असते.  डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर तालुक्यांत कमी पाऊस पडतो.

भूरूपे :

अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत.  पूर्णा नदीच्या खोऱ्यायाचा बहुतेक भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्ह्यात उत्तर भागात गाविलगडचे डोंगर, तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नर्नाळा किल्ला आहे. भूरूपांच्या उंचसखलपणावरून प्राकृतिक रचना समजते.

अकोला जिल्ह्याचा इतिहास :

अकोला हा विदर्भातील जिल्हा आहे. निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात 19 व्या शतकात बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती.

जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत. नरनाळा किल्ला आणि तेथील वन्यजीव अभयारण्य ह्या तर आहेतच अकोल्याच्या लक्षणीय गोष्टी. कोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा एखादी व्यक्ती जोडलेली असते.

See also  पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Palghar District Information In Marathi

अकोला या शहराशीदेखील अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.  त्यानेच हे शहर वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले.

अकोला हे उत्तर महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मोडणारा हा जिल्हा 1956 साली मुंबई प्रांतात सामील करून घेण्यात आला व त्यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्राच्या स्थापने बरोबरच अकोला जिल्ह्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.

जल पुरवठा :

अकोला जिल्ह्यात विहिरी व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यांत विहिरी जास्त आहेत. तेल्हारा तालुक्यात वान धरण आहे.

याशिवाय महान, मोर्णा ही धरणे जिल्ह्यात आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील धरण- प्रकल्प जिल्ह्यात मोठा आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गुणा यांच्यावर धरणे आहेत.

गाविलगडचा डोंगराळ प्रदेश :

या विभागात जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट  तालुक्यांचा उत्तर भाग येतो.

अजिंठ्याचा डोंगराळ व पठारी प्रदेश :

जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. हा भाग बराचसा पठारी आहे. यात पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा भाग येतो.

पूर्णा नदीचा सखल प्रदेश :

या प्रदेशात जिल्ह्याचा मध्यभाग येतो. यात मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यांचा दक्षिण भाग यांचा समावेश होतो. बार्शीटाकळी तालुक्याचा उत्तर भागही यात येतो.

प्रमुख नद्या :

अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रूपा, आस, इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात. उमा, काटेपूर्णा, मोर्णा  व मन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याशिवाय निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते.

वाशीम जिल्ह्यात  काटेपूर्णा नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व अकोला या तालुक्यांतून वाहते. ती लाईत गावाजवळ पूर्णा नदीस मिळते. मूर्तिजापूर तालुक्यात सांगवी या ठिकाणा जवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.

See also  नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nashik District Information In Marathi

वाहतूक :

अकोला जिल्ह्यातील वाहतूक रस्ते व लोहमार्गाने चालते. रस्ते राष्ट्रीय महामार्ग मुंबई – नागपूर-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बाळापूर, अकोला, कुरणखेड, मूर्तिजापूर, इत्यादी ठिकाणे आहेत. लोहमार्ग जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर ही दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत.

जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात. मुंबई – नागपूर – कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, मूर्तिजापूर आदी स्थानके आहेत.

खांडवा – पूर्णा लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शीटाकळी इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून हिंगोलीमार्गे पूर्णाकडे जातो. सध्या पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे.

ग्यामार्गे अकोला – कुचीपूडी आणि नागपूर – कोल्हापूर रेल्वे सुरु आहेत. अकोला – खण्डवा मार्ग अजुनही नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वऱ्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.

वनस्पती व प्राणी:

अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डोंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग , ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन, आढळते तसेच  चारोळीचे उत्पादनही होते. जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.

शेती :

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके होतात.

खरीप पिके :

अकोला जिल्ह्यात कापूस हे मुख्य खरीप पीक आहे. अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट या तालुक्यांत कापसाचे पीक जास्त होते. या शिवाय इतर तालुक्यांतही थोडाफार कापूस होतो. खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.

ज्वारीचे पीक अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांत सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते. याशिवाय मूग, तूर, तांदूळ,  भुईमूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिके जिल्ह्यात घेतली जातात.

  • बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती
See also  जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalana District Information In Marathi

रब्बी पिके :

रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, जवस, करडई, आदी पिके होतात. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होत असून त्यात मुख्यत: संत्री, मिरची,  ऊस, केळी, पेरू, बोरे, पपई आणि टरबूज आदी पिके घेतली जातात. तेल्हारा व अकोट तालुक्यात विड्याच्या पानांचे उत्पादन होते.

अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळे :

  • अकोला किल्ला
  • नरनाळा किल्ला
  • राज राजेश्वर मंदिर
  • नरनाळा वन्यजीव अभयारण्य
  • बलपूर किल्ला
  • साला सर बालाजी टेम्पल.

अकोला :

मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.

बाळापूर :

बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला. या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.

नरनाळा :

येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.

मूर्तीजापूर :

येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.

पातुर :

हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.

पारस :

औष्णिक वीज निर्मिती केंद्र.

अकोट :

सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.

आडगाव :

ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच

इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.

हिवरखेड :

आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment